गडचिरोली अचानक प्रकृती खालावल्यानंतर वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने चार वर्षीय बालकाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. आर्यन अंकित तलांडी (रा. कोरेली, ता. अहेरी) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना २४ जून रोजीची असून तीन दिवसानंतर उघडकीस आली. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अहेरी तालुक्यातील कोरेली या दुर्गम गावातील अंकित तलांडी न्यांचा मुलगा आर्यन याची २३ जून रोजी मध्यरात्री प्रकृती खालावली. पाच किमी लांब परमिली आरोग्य केंद्रात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आर्यनवर प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारासाठी अहेरी येथे नेण्यास सांगितले.
परंतु वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पालक आर्यनला घेऊन बसने निघाले. वाटेत त्याची प्रकृती अधिक खालावली. बसचालक गौरव आमले यांनी बस थेट आलापल्ली आरोग्य केंद्रात नेली.
परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. आरोग्य विभागाच्या ढिसाळ कार्यपद्धतीमुळे या भागात दरवर्षी अशा हृदयद्रावक घटना घडतात. पण, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व्यवस्थेत सुधारणा होण्याऐवजी अधिकच बिघाड होत असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, अवजळ वाहतुकीमुळे परिसरातील रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी चंद्रपूर, गडचिरोली जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
गडचिरोली येथील महीला व बाल रुग्णालयात 24 सप्टेंबर रोजी झालेल्या सिझेरियन प्रसूतीनंतर दोन मातांचा मृत्यु झाल्यानंतर तिन ऑक्टोंबर मंगळवारी नागपूर येथील मेडिकल रूग्णालयात भरती असलेल्या मातेचाही उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने आता त्या सिझेरियन प्रसुतीनंतर मृत मातांची संख्या तीन झाली आहे.
वैशाली सत्यवान मेश्राम वय 25 वर्ष रा. आष्टी. ता. चामोर्शी जिल्हा. गडचिरोली असे मृत महिलेचे नाव आहे. वैशाली मेश्राम हीला मुलगी झाली होती.
25 सप्टेंबर रोजी गडचिरोली येथिल महीला व बाल रुग्णालयात सिझेरियन प्रसुतीनंतर उज्वला बुरे, रजनी शेडमाके, वैशाली श्रम आणि अन्य महीला यांची प्रकृती खालावली. यात रजनी शेडमाके हीचा गडचिरोली येथील रुग्णालयातच तर उज्वला बुरे हिला नागपूर येथे नेताना वाटेतच मृत्यु झाला. तर वैशाली मेश्राम हिच्यावर नागपूर येथील मेडिकल रूग्णालयात उपचार सुरू असताना 3 ऑक्टोंबर रोजी मृत्यु झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे च या मातांचा मृत्यु झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून यामध्ये तीन नवजात बालके आपल्या आईविना पोरकी झाली आहे. या घटनेनंतर गडचिरोली येथिल महीला रुग्णालयाच्या आरोग्यव्यवस्थेवर नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. तसेच या घटनेची गंभीर दखल घेऊन मृत महिलांच्या कुटुंबीयांना सरकारने आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात येत आहे.